मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा : भुसावळातील भोळे महाविद्यालयात आनंदोत्सव


भुसावळ (05 ऑक्टोबर 2024) :  दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयात केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.पी.फालक यांच्या अध्यक्षतेखाली मराठी विभाग व वाड्मय मंडळ यांचे संयुक्त विद्यमाने आनंदोत्सव साजरा करण्यात आला. मराठी विभागप्रमुख प्रा.डॉ.संजय बाविस्कर यांनी या कार्यक्रमाची रुपरेषा व्यक्त केली.

चळवळीच्या लढ्याला आले यश
प्राचार्य डॉ.आर.पी.फालक म्हणाले की, मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त व्हावा यासाठीचा लढा हा जुना आहे,. राज्य पातळीवर बराच पाठपुरावा केला चळवळ उभी राहिली. मराठी भाषेच्या समृद्धीसाठी आणि संवर्धनासाठी यापुढे केंद्र सरकारतर्फे भरीव ग्रॅण्ट सुध्दा मिळेल, याबरोबरच अलिकडे महाराष्ट्र शासनाने मराठी भाषेच्या स्वतंत्र विद्यापीठाची अमरावती येथे निर्मिती केली यामुळे तर मराठी भाषेला संवर्धनासाठी गती मिळेल, चालना मिळेल, असेही ते म्हणाले. यशस्वीतेसाठी प्रा.संजय बाविस्कर, डॉ.जगदीश चव्हाण, डॉ.अंजली पाटील, डॉ.जयश्री सरोदे, प्रा.श्रेया चौधरी, डॉ.आर.बी.ढाके, प्रा.आर.डी.भोळे यांनी परिश्रम घेतले.


कॉपी करू नका.