भुसावळ शहरात विवाहितेचा विनयभंग : दोघांविरोधात गुन्हा
Rape of married couple in Bhusawal city : Crime against both भुसावळ (12 ऑक्टोबर 2024) : शहरातील एका भागातील 23 वर्षीय विवाहितेचा विनयभंग करण्यात आल्याची घटना 9 रोजी रात्री साडेनऊ वाजता घडली. याप्रकरणी दोघांविरोधात शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
दोघांविरोधात गुन्हा दाखल
22 वर्षीय विवाहितेच्या तक्रारीनुसार, संशयीत लखन परदेशी (26) याने हात पकडून मनास लज्जा निर्माण होईल, असे कृत्य केले तर करन परदेशी (22) याने फिर्यादीच्या आई-वडिलांसह भावाला दमदाटी करीत चापटा-बुक्क्यांनी मारहाण केली. दोघांविरोधात शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस निरीक्षक उद्धव डमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समीना तडवी करीत आहेत.