प्रलोभने दाखवणार्‍या सत्ताधार्‍यांना जनताच धडा शिकणार : आमदार एकनाथराव खडसे

विकासकामांना गती देण्यासाठी साथ द्या : अ‍ॅड.रोहिणी खडसे


People will learn a lesson from those in power who show temptation : MLA Eknathrao Khadse सावदा (14 ऑक्टोबर 2024)  : राज्यातील सत्ताधारी हे विविध योजनांची प्रलोभने दाखवत आहेत परंतु आतापर्यंत त्यांनी सर्वसामान्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्याने या विधानसभा निवडणुकीत जनताच त्यांना धडा शिकवेल, असे आमदार एकनाथराव खडसे म्हणाले. 30 वर्षांच्या कालखंडात मुलभूत सुविधा, रस्ते, सिंचन, आरोग्य, शिक्षण यासाठी निधी आणुन मतदारसंघाचा सर्वांगिी विकास केला. कामे करत असताना कोणतेही मतभेद, अभिनवेश न बाळगता विकासाला प्राधान्य दिले म्हणूनच आपण 30 मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली, असेही ते विकासकामांच्या उद्घाटनप्रसंगी म्हणाले.

विविध विकासकामांचे उद्घाटन
माजी महसूल मंत्री विधानपरिषद सदस्य आमदार एकनाथराव खडसे यांच्या स्थानिक विकास निधी अंतर्गत रावेर तालुक्यातील ऐनपूर, वाघोदा खुर्द, वाघोदा बु.॥, मांगलवाडी, खिर्डी खुर्द, खिर्डी बु.॥, पुरी, बलवाडी, उदळी बु.॥ येथे विकासकामांचे माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी ज्येष्ठ नेते अ‍ॅड.रवींद्र पाटील, राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्ष अ‍ॅड.रोहिणी खडसे, जिल्हा सरचिटणीस ईश्वर रहाणे, माजी सभापती निवृत्ती पाटील, तालुकाध्यक्ष किशोर पाटील उपस्थित होते.

विकासकामांसाठी साथ दय
अ‍ॅड.रोहिणी खडसे म्हणाल्या की, आमदार खडसे यांच्या माध्यमातून आतापर्यंत गावातील अंतर्गत रस्ते, गटार, सभागृह इत्यादी मुलभूत सुविधा आणि गाव जोडणारे रस्ते आणि इतर विकास कामांसाठी कोट्यवधी रुपयांचा विकास निधी मिळाला आहे व यापुढेही विकासकामे करण्यासाठी तुमची साथ गरजेची आहे. माजी जिल्हाध्यक्ष रविंद्रभैय्या पाटील यांनीसत्ताधारी हे शेतकरी, कष्टकरी, महिला युवकांचे प्रश्न सोडविण्यासाठी अपयशी ठरल्याचे सांगितले.

यांची होती उपस्थिती
पंचायत समितीचे माजी सदस्य दीपक पाटील, जगदीश बढे, योगीता वानखेडे, सचिन महाले, सुनील कोंडे, नितीन पाटील, शशांक पाटील, अमोल महाजन, किशोर महाजन, काशीनाथ महाजन, किरण नेमाडे, भागवत कोळी, श्रीकांत चौधरी, गणेश देवगिरीकर, रोहन चर्‍हाटे, सलमान खान, हैदर खान, अरविंद महाजन, मोहन कचरे, पवन चौधरी, शुभम मुर्‍हेकर, शांताराम पाटील, सुशील पाटील, ललित पाटील, अश्विनी बार्‍हे, लोटू पाटील, राजेंद्र चौधरी, मधुकर पाटील, सुनील पाटील, उज्वल पाटील, सुधीर पाटील, सुनील कोल्हे, नीळकंठ बढे, मनोज भंगाळे, उल्हास भंगाळे, संतोष महाजन, अय्यास शे.गयास,
गजानन कांडेले, मालती तायडे, दीपक तायडे, विजय तायडे, सतीश पाटीलल, प्रदीप पाटील, अजय पाटील, हरी पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.


कॉपी करू नका.