दुचाकी अपघात : जखमी महिलेची प्रकृती गंभीरच


यावल (20 ऑक्टोबर 2024) : यावल-भुसावळ रस्त्यावर यावल शहराच्या बाहेरील पेट्रोल पंपाजवळ शुक्रवारी एका दाम्पत्याच्या दुचाकीचे टायर फुटून अपघात घडला. यात पती जागीच मृत्यू झाला तर पत्नी गंभीर जखमी झाली. महिलेची प्रकृती अद्यापही गंभीर असून मयतावर शनिवारी सकाळी शिरसाड गावात अंतसंस्कार करण्यात आले.

महिलेची प्रकृती गंभीरच
यावल-भुसावळ रस्त्यावर शहराच्या बाहेर पेट्रोल पंपाच्यासमोर शुक्रवारी सायंकाळी चार वाजता भुसावळकडून यावलकडे दुचाकी (क्रमांक एम. एच.19 एन. 2433) द्वारे जगदीश वासुदेव अत्तरदे (53) व त्यांची पत्नी हेमलता जगदीश अत्तरदे (45) हे येत असताना पेट्रोल पंपाजवळ त्यांच्या दुचाकीचे पुढील टायर फुटले आणि भरधाव वेगातील दुचाकी थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जाऊन धडकली. या अपघातात अत्तरदे जागीच ठार झाले व पत्नी हेमलता ही गंभीर जखमी झाली. विवाहितेची प्रकृती अद्याप ही गंभीर आहे. तिच्यावर जळगाव येथे एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर मयत जगदीश अत्तरदे यांच्यावर शनिवारी सकाळी साडे अकरा वाजेला शिरसाड गावात शोकाकुल वातावरणात अंतसंस्कार करण्यात आले.


कॉपी करू नका.