काळाडोह येथे 12 वर्षीय बालकाला सर्पदंश


यावल (21 ऑक्टोबर 2024) : यावल तालुक्यातील हिंगोणा येथून जवळच असलेल्या काळाडोह गावातील आदिवासी वस्तीवर रविवारी 12 वर्षीय बालक आपल्या कुटुंबासह मका कणसे वेचणीचे काम करत असतांना त्याच्या उजव्या पायाला सापाने दंश केला. हा प्रकार निदर्शनास येताच त्याला तातडीने तेथून यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. या ठिकाणी डॉक्टरांनी प्रथमोपचार केले. तरुाची प्रकृती बिघडत असल्याने त्याला जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

बालकाची प्रकृती गंभीर
हिंगोणा, ता.यावल येथून जवळच सातपुड्याच्या कुशीत काळाढोह ही वस्ती आहे. या वस्तीवर लालसिंग इसालाल भिलाला (12) हा बालक आपल्या कुटुंबासह रविवारी मका कणीस वेचणीचे काम करत होता. दरम्यान त्याच्या उजव्या पायाला अचानक सापाने दंश केला. हा प्रकार निदर्शनास येताच त्याला तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉ.तुषार सोनवणे, डॉ.अमीन तडवी, अधिपरिचारिका आरती कोल्हे, पिंटू बागुल आदींनी त्याच्यावर प्रथमोपचार केले. त्याची प्रकृती बिघडत असल्याने त्याला तातडीने पुढील उपचारार्थ जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे. बालकाची प्रकृती सध्या गंभीर आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !