किनगाव बुद्रुक गावात 50 वर्षीय शेतकर्‍याला दोघांची मारहाण


यावल (20 ऑक्टोबर 2024) : यावल तालुक्यातील किनगाव बुद्रुक येथे प्लॉट भागातून 50 वर्षीय शेतकरी शेतात जात असताना त्याचा रस्ता अडवून दोन जणांनी त्याला शिविगाळ करीत काठीने मारून दुखापत करण्यात आली. याबाबत शनिवारी यावल पोलीस ठाण्यात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

असे आहे मारहाण प्रकरण
किनगाव बुद्रुक गावातील शेतकरी सुपडू रतीलाल साळुंखे (50) हे गावातील प्लॉट भागाकडून शेतात जात असताना त्यांचा रस्ता प्रशांत रघुनाथ साळुंखे व त्याच्यासोबत असलेल्या एका अनोळखी इसमाने अडवला व त्या दोघांनी शेतकर्‍याला शिविगाळ करून मारहाण केली. तसेच काठीने त्यांच्या पाठीवर, डाव्या हातावर मारहाण करून दुखापत केली व तू शेतात जर दिसला तर तुला मारून टाकू अशी धमकी दिली. तेव्हा याबाबत सुपडू साळुंखे यांनी यावल पोलीस ठाण्यात दोन जणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार उमेश महाजन करीत आहे.


कॉपी करू नका.