कोळवद येथे वीज चोरी : सहा जणाविरुद्ध वीज चोरीचा गुन्हा


यावल (20 ऑक्टोबर 2024) : यावल तालुक्यातील कोळवद येथे राज्य विद्युत वितरण कंपनीकडून वीज चोरीविरुद्ध धडक मोहिम राबवण्यात आली. या मोहिमेमध्ये त्यांना सहा जण वीज चोरी करतांना आढळले. सहा जणांनी चोरी केलेल्या वीज युनिटनुसार त्यांना दंड आकारून नोटीस देण्यात आली मात्र या सहा जणांनी नोटीस मिळाल्यानंतर दंड न भरल्याने या सहा जणांविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात शनिवारी वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

असे आहे वीज चोरी प्रकरण
कोळवद, ता.यावल येथे राज्य विद्युत वितरण कंपनीच्या ग्रामीण कक्षाचे सहाय्यक अभियंता दीपक चौधरी यांच्या नेतृत्वात वीज चोरीविरुद्ध धडक मोहिम राबवण्यात आली. यामध्ये नथ्थु फत्तु तडवी, संजय रवींद्र सूर्यवंशी, सुभाष कमलाकर फेगडे, रमजान फकीरा तडवी, महारू उस्मान तडवी व भास्कर आत्माराम पाटील हे सहा जण वीज चोरी करतांना आढळून आले होते. या सहा जणांनी मागील एक वर्षापासून एक हजार 286 युनिट वीज चोरी केल्याचे निदर्शनास आले होते. त्यांना 23 हजार 077 रुपये व तडजोड आकारणी करून दंड भरण्याची नोटीस बजविण्यात आली होती मात्र यात सहा जणांनी वेळेत दंड भरल्याने यावल पोलीस ठाण्यात सहाय्यक अभियंता दीपक चौधरी यांच्या फिर्यादीवरून वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक किशोर परदेशी करीत आहे.


कॉपी करू नका.