जळगावात भामट्याने वृद्धेची पोत लांबविली


जळगाव (20 ऑक्टोबर 2024) : 68 वर्षीय वृद्धेच्या गळ्यातील सुमारे 70 हजार रुपये किंमतीची सोन्याची पाटली जुनी पोत चोरट्याने लंपास केली. ही घटना बुधवार, 16 रोजी नवीन बस स्थानक परिसरात दुपारी 3.30 वाजेच्या सुमारास घडली.

चोर्‍या वाढल्या
पुष्पा साहेबराव चौधरी (68, रा.संभाजीनगर पारिजात कॉलनी) या बसस्थानकात आल्या होत्या. गर्दीचा फायदा घेत चोरट्याने त्यांच्याकडील सोन्याची पाटली पोत चोरुन नेली. या प्रकरणी तक्रारीनुसार शुक्रवार, 18 रोजी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. तपास हवालदार नरेश सोनवणे हे करीत आहेत.


कॉपी करू नका.