गौरी लंकेश हत्येतील आरोपीच्या शिंदे सेनेतील नियुक्तीस स्थगिती


जालना (21 ऑक्टोबर 2024) : शिंदे सेनेतील श्रीकांत पांगारकरची शुक्रवारी शिंदे सेनेच्या जालना विधानसभा प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली मात्र पांगारकरांवर गौरी लंकेश हत्या व नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरणात आरोप असल्याने याबाबत स्थानिक पातळीवर झालेल्या या नियुक्तीवर टीकेची झोड उठल्यानंतर नियुक्तीला थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्थगिती दिल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली.

ते तर शिवसैनिकच : नियुक्तीला स्थगिती
शुक्रवारी जालना शहरात शिंदे सेनेचे नेते अर्जुन खोतकर यांच्या निवासस्थानी झालेल्या कार्यक्रमात पांगारकरला प्रवेश देण्यात आला व नियुक्तिपत्र देण्यात आले. तो विधानसभेच्या उमेदवारीसाठीही प्रयत्न करत होता. शिंदे सेनेचे सहसंपर्कप्रमुख पंडित भुतेकर म्हणाले की, पांगारकर यांच्या नियुक्तीस फक्त स्थगिती दिली आहे. ते शिवसैनिक आहेतच. त्यांना कोणत्याही पदाची अपेक्षा नाही. ते शिवसैनिक म्हणून आपले काम सुरूच ठेवतील.


कॉपी करू नका.