महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 : 13 ते 20 नोव्हेंबर कालावधीत निवडणूक निकालाचे अंदाज प्रसारीत करण्यास प्रतिबंध


धुळे (25 ऑक्टोबर 2024) : महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी भारत निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. या निवडणूकीसाठी 20 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 7.00 ते सायंकाळी 6.00 वाजेदरम्यान मतदान होणार आहे. त्यानुसार 13 नोव्हेंबर, 2024 रोजीच्या सकाळी 7.00 वाजेपासून ते 20 नोव्हेंबर, 2024 रोजी सायंकाळी 6.30 वाजेपर्यंत महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या निकालाचे अंदाज (एक्जीट पोल) सर्व प्रसार माध्यमांवर प्रसारीत करण्यास प्रतिबंधीत करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.

एक्झीट पोलवर घातली बंदी
जिल्हाधिकारी पापळकर यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले की, विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी धुळे जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदार संघासाठी 20 नोव्हेंबर, 2024 रोजी मतदान तर 23 नोव्हेंबर, 2024 रोजी मतमोजणी होणार आहे. भारत निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार बुधवार, दि. 13 नोव्हेंबर रोजीच्या सकाळी 7.00 वाजेपासून ते बुधवार, दि.20 नोव्हेंबर, 2024 रोजी सायंकाळी 6.30 वाजेपर्यंत या कालावधीत महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या निकालाचे अंदाज (एक्जीट पोल) प्रिंट मिडीया, इलेक्ट्रॉनिक मिडीया, दूरदर्शन, आकाशवाणी अशा सर्व प्रसार माध्यमांवर प्रसारीत करण्यास प्रतिबंधीत केले आहे. त्यासंदर्भात अधिसूचना महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात प्रकाशित करण्यात आल्याचेही त्यांनी कळविले आहे.


कॉपी करू नका.