राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची दुसरी यादी जाहीर : पारोळा-एरंडोल मतदारसंघातून सतीशअण्णा पाटील यांना उमेदवारी
Satishanna Patil एरंडोल (26 ऑक्टोबर 2024) : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने शनिवारी विधानसभा निवडणुकीसाठी आपली दुसरी उमेदवार यादी जाहीर केली. त्यात पक्षाने एरंडोल विधानसभा मतदारसंघातून सतीश अण्णा पाटील यांना उमेदवारी दिली आहे.
महाविकास आघाडीच्या बहुतांश उमेदवारांची यादी जाहीर झाली असली तरी एरंडोल-पारोळ्याचा तिढा सुटत नव्हता. येथून शिवसेनेचा उमेदवार निवडून आलेला असल्यामुळे शिवसेना-उबाठा पक्षाने या मतदारसंघावर दावा ठोकला होता तर दुसरीकडे शरद पवार गटानेही यावरील आपला दावा सोडला नव्हता. यामुळे येथे मोठा तिढा निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली. त्यात एरंडोल मतदारसंघातून डॉ. सतीशअण्णा पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. ते तुतारी या चिन्हावर लढतील हे स्पष्ट आहे.


महायुती व महाविकास आघाडीसह अपक्षांमध्ये लढत
डॉ.सतीश पाटील यांची लढत शिवसेनेचे उमेदवार अमोल चिमणराव पाटील तसेच रिंगणातील अपक्षांसोबत असून निकालात कोण बाजी ? हे 23 नोव्हेंबरच्या निकालाअंती स्पष्ट होणार आहे.
या उमेदवारांना मिळाली संधी
सतीश अण्णा पाटील- एरंडोल
सतीश चव्हाण- गंगापूर
पांडूरंग वरोरा- शहापूर
राहुल मोटे- परांडा
संदीप क्षीरसागर – बीड
मयुरा काळे – आर्वी
दीपिका चव्हाण – बागलाण
माणिकराव शिंदे – येवला
उदय सांगळे – सिन्नर
सुनीत चारोसकर – दिंडोरी
सचिन दोडके – खडकवासला
गणेश गीते – नाशिक पूर्व
ओमी कलाणी – उल्हासनगर
सत्यशिल शेलकर – जुन्नर
सुलक्षणा शिलवंत – पिंपरी
अश्विनी कदम – पर्वती
अमित भांगरे – अकोले
अभिषेक कळंबकर – अहिल्यानगर शहर
उत्तम जानकर – माळशिरस
दीपक चव्हाण – फलटण
नंदिनी बाभूळकर – चंदगड
मदन कारंडे – इचलकरंजी


