धुळ्यात मद्य विक्रेत्याकडे आयकर विभागाची छापेमारी


धुळे (27 ऑक्टोबर 2024) : आयकर विभागाच्या 50 हून अधिक अधिकार्‍यांच्या पथकाने धुळ्यातील मद्य विक्रेते राजेश गलाणी यांच्यासह घर, कार्यालय व दोन गोदाम या ठिकाणी शुक्रवारी सकाळी एकाच वेळी छापेमारी केल्यानंतर खळबळ उडाली. पथकाच्या सुरक्षेसाठी 25 सशस्त्र पोलिसांसह धुळे पोलीसही तैनात होते.

50 हून अधिकार्‍यांकडून तपासणी
आयकर विभागाच्या पथकात छत्रपती संभाजी नगर, नाशिक, मुंबई, नागपूरचे 50 अधिकारी, कर्मचारी होते. पथकाकडून रात्री उशीरापर्यंत कागदपत्र, पावत्या व अन्य नोंदीची तपासणी शुक्रवारी व शनिवारी करण्यात आली.

पथकातील सर्वच सदस्यांचे मोबाईल जप्त
पांढर्‍या रंगाच्या दहा खाजगी वाहनाने हा ताफा शहरात आला. पथकातील सर्वांचे मोबाइलही जप्त करण्यात आले होते. त्यामुळे गोपनीयता राखण्यात आले. 25 शस्त्रधारी पोलिस, आयकर विभागाचे पथक व दहा स्थानिक पोलिसांची मदत घेण्यात आली. आयकर विभागाचे चार जिल्ह्यांचे पथक होते. त्यात 50 आयटी अधिकार्‍यांचा समावेश होता, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली.

 


कॉपी करू नका.