रावेर विधानसभा मतदारसंघात विकासकामे करण्यासाठी कटीबध्द : धनंजय चौधरी


रावेर (11 नोव्हेंबर 2024) : न्हावी येथे आमदार शिरीषदादा चौधरी यांच्या माध्यमातून न्हावी ते आमोदा रस्ता न्हावी ते हिंगोणा रस्ता जलजीवन मिशन तीन कोटी रुपये पाणीपुरवठा योजना तसेच अंतर्गत काँक्रिटीकरण रस्ते, पेव्हर ब्लॉक, न्हावी आमोदा रोडवर लॅम्प व इतर विकासकामे करण्यात झालेली असून भविष्यात सुद्धा विकास कामे करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे प्रतिपादन रावेर-यावल विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार धनंजय चौधरी यांनी केले. न्हावी येथील ग्रामस्थांशी ते संवाद साधत होते.

विकासासाठी संधी देण्याचे आवाहन
रावेर विधानसभा मतदारसंघ निवडणूक 2024 च्या प्रचारासाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार धनंजय शिरीष चौधरी यांच्या प्रचार फेरी दरम्यान रावेर तालुक्यातील न्हावी येथे आले असता त्यांनी येथील ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी या निवडणुकीत आपले मतदानरुपी आशीर्वाद देऊन मतदारसंघात पुनश्च विकासाचा झंझावात सुरू करण्याची संधी द्यावी, अशी ग्रामस्थांना विनंती केली.

यांचा प्रचारात सहभाग
प्रचार फेरीत त्यांच्या समवेत जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रभाकर अप्पा सोनवणे, माजी पंचायत समिती सभापती लिलाधर शेठ चौधरी, न्हावी गावचे लोकनियुक्त सरपंच देवेंद्रदादा चोपडे, उपसरपंच नदीमदादा पिंजारी, माजी पंचायत समिती सदस्य सर्फराज तडवी, ज्ञानेश्वर बर्‍हाटे, चिनावल गावचे माजी सरपंच नरेंद्र पाटील (बापू पाटील), केतन किरंगे, रियाज मेंबर, प्रा. एम.टी.फिरके सर, निळकंठ फिरके, रमेश महाजन, गुणवंत टोंगले, कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती भानुदास चोपडे, सुनीलकाका फिरके, विलास चौधरी, ग्रामपंचायत सदस्य नितीन इंगळे, चेतन इंगळे, देवेंद्र चौधरी, मधुकर झोपे, नेमिदास भंगाळे, सुनील वाघुळदे, भूषण फिरके, विश्वनाथ तायडे, सिद्धार्थ तायडे, किशोर पाटील, शांताराम मोरे, चेतन झोपे, संजय वाघूळदे, देवेंद्रभाऊ चौधरी, संगम फिरके आदींसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


कॉपी करू नका.