भुसावळकरांची पसंती आमदार संजय सावकारेंनाच : सलग चौथ्यांदा विजयाचा चौकार
Bhusawalkar’s preference is for MLA Sanjay Savkare : Four wins for the fourth consecutive time भुसावळ (23 नोव्हेंबर 2024) : कुठल्याही नेत्यांची न झालेली सभा, विरोधकांनी टीकेचे बाण चालवल्यानंतरही केवळ मतदारसंघात केलेली कामे व शासनाच्या जनताभिमुख योजनांचा प्रचार, प्रसार करीत आमदार संजय सावकारे यांनी विरोधातील सर्व सामाजिक समीकरणांना फेल ठरवत चौथ्यांदा विधानसभा निवडणूक लढली व जनतेने त्यांना चौथ्यांदा विजयाचे आशीर्वाद दिले. आमदारांच्या विजयानंतर त्यांना महायुती सरकारमध्ये निश्चितपणे मंत्री पद मिळण्याची कार्यकर्त्यांना आशा आहे.
भुसावळात कार्यकर्त्यांचा जल्लोष ; आमदार थिरकले
भुसावळ तहसील कार्यालयाच्या गोदामात शनिवारी सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरूवात झाली. दुपारी एक वाजता निकाल समोर येताच कार्यकर्त्यांनी ढोल-ताशांचा गजर व गुलालाची उधळण करीत जल्लोष केला. आमदारही यावेळी कार्यकर्त्यांसोबत थिरकले. आता भुसावळच्या वाट्याला निश्चितपणे मंत्री पद येईल, अशी आशा कार्यकर्त्यांना आहे.

47 हजार 459 मतांचा लीड
आमदार संजय सावकारे यांना 47 हजार 459 मतांचा लीड मिळाला असून सलग चौथ्यांदा त्यांनी आपले वर्चस्व भुसावळात सिद्ध केले आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुकीनंतर आगामी पालिका व जि.प. व पंचायत समिती निवडणुकीतही यश मिळेलच, असा विश्वास कार्यकर्त्यांमध्ये तयार
झाला आहे.
प्रमुख उमेदवारांना अशी मिळाली मते
आमदार संजय सावकारे (भाजपा) 107219
डॉ.राजेश मानवतकर (काँग्रेस) 59760
स्वाती जंगले (अपक्ष) 9760
जगन सोनवणे (वंचित) 3716
राहुल नारायण बनसोडे (बसपा) 534
अजय जीवराम इंगळे (अपक्ष) 504
गौरव धनराज बाविस्कर (अपक्ष) 160
प्रतिभा सुजीत जगदाळे (अपक्ष) 643
सुशील ज्ञानेश्वर मोरे (अपक्ष) 391




