भुसावळातील गोरक्षक रोहित महाले यांचा सन्मान
Rohit Mahale, a cow vigilante from Bhusawal, was honored भुसावळ (27 नोव्हेंबर 2024) : भुसावळातील गोरक्षक व मानद पशू कल्याण अधिकारी रोहित महाले यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत शिवचैतन्य जागरण यात्रा, गो सेवा संगम संभाजी नगर येथे एका कार्यक्रमात प.पू.गोविंदगिरीजी महाराज यांच्या सानिध्यात त्यांना नुकतेच सन्मानीत करण्यात आले.
यावेळी श्रीराम जन्मभूमी अयोध्या व मथुराचे कोषाध्यक्ष व आनंद चैतन्यजी महाराज (कन्नड) यांची उपस्थिती होती. गोरक्षक रोहित महाले हे गेल्या 19 वर्षांपासून गोमातेसह मुक्या जीवांची कत्तल रोखण्यासाठी प्रभावी कार्य करीत असून या कार्याची दखल घेत त्यांना सन्मानीत करण्यात आले.