भुसावळातील वयोवृद्धाचा अज्ञात वाहनाच्या धडकेने मृत्यू
Elderly man in Bhusawal dies after being hit by unknown vehicle भुसावळ (29 नोव्हेंबर 2024) : अज्ञात चारचाकी वाहनाने जोरदार धडक दिल्याने शहरातील 68 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला. हा अपघात मंगळवारी रात्री भुसावळ शहरातील साक्री फाट्याजवळ घडला.. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. विक्रम लक्ष्मण जाधव (68, रा.राकानगर, भुसावळ) असे मयताचे नाव आहे.
पायी चालणार्या वृद्धाला वाहनाची धडक
जळगाव शहरातील राका नगरात विक्रम लक्ष्मण जाधव हे वृद्ध आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. मंगळवार, 26 नोव्हेंबर रोजी रात्री 9 वाजता विक्रम जाधव हे त्यांचे मित्र सुभाष शुक्ला व रविशंकर जैन यांच्यासोबत भुसावळातील साक्री फाट्याजवळील हॉटेल मधुबन येथे जेवण केल्यानंतर ते फिरायला निघाले होते. त्यावेळी जळगावच्या दिशेने जाणार्या एका अज्ञात चारचाकी वाहने विक्रम जाधव यांना जोरदार धडक दिली. या अपघातात डोक्याला व हाता पायाला जबर दुखापत झाल्याने विक्रम जाधव यांचा जागेवरच मृत्यू झाला. दरम्यान या घटनेबाबत भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात चारचाकी वाहनावरील अज्ञात चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला.