जळगावात बसमध्ये चढताना महिलेची पोत भामट्याने लांबविली


जळगाव (29 नोव्हेंबर 2024) : जळगाव-पाचोरा एस.टी. बसमध्ये चढत असताना भामट्याने महिलेच्या गळ्यातील सुमारे 14 ग्रॅम वजनाची 42 हजार रुपये किमतीची मंगलपोत चोरून पोबारा केला. ही घटना बुधवार, 27 रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास येथील नवीन बसस्थानक परिसरात घडली. प्रकार लक्षात आल्यानंतर महिलेने आरडाओरड केली. मात्र तोवर चोरटा पसार झाला होता.

सोनाली ज्ञानेश्वर गांगुर्डे (36, रा.बपडी मंदिर, मानेनगर, नाशिक) या गृहिणी पाचोरा येथे जाण्यासाठी जळगाव- पाचोरा बसमध्ये चढत होत्या. दरवाजाच्याजवळ प्रवाशांची गर्दी झाली. याचा फायदा घेत चोरट्याने महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत लांबविली.

बसमध्ये बसल्यानंतर हा प्रकार महिलेच्या लक्षात आला. त्यांनी आरडाओरड केली. जिल्हापेठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत माहिती घेतली. या प्रकरणी तक्रारीनुसार जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. तपास हवालदार नरेश सोनवणे हे करीत आहेत.


कॉपी करू नका.