दुचाकी घेण्यासाठी 50 हजार न आणल्याने भुसावळातील विवाहितेचा छळ : पतीसह सहा जणांविरोधात गुन्हा
Married woman in Bhusawal harassed for not bringing 50 thousand to buy a two-wheeler: Case filed against six people including husband भुसावळ (4 डिसेंबर 2024) : दुचाकी घेण्यासाठी माहेरून 50 हजार रुपये न आणल्याने विवाहितेचा छळ करण्यात आला. याप्रकरणी पतीसह सहा जणांविरोधात बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
असे आहे छळ प्रकरण
विशाखा चेतन पारधे (24, ह.मु.पंचशील नगर, भुसावळ) यांच्या तक्रारीनुसार, आरोपी पतीसह सासरच्या मंडळींनी लग्नानंतर दुचाकी घेण्यासाठी माहेरून 50 हजार रुपये न आणल्याने तसेच अन्य कारणावरून शिविगाळ करीत मारहाण केली. याप्रकरणी पती चेतन सुनील पारधे, निर्मला सुनील पारधे, किरण सुनील पारधे, पूनम शरद पारधे, उषा सोनवणे, कैलास सोनवणे (शंकेश्वर क्रिस्टल, टिटवाडा पूर्व कल्याण, जि.ठाणे) यांच्याविरोधात बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास नाईक जुबेर तडवी करीत आहेत.