भुसावळातील दे.ना.भोळे महाविद्यालयात कवयित्री बहिणाबाई चौधरी यांना विनम्र अभिवादन
भुसावळ (4 डिसेंबर 2024) : दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयात वाड्मय मंडळ अंतर्गत मंगळवार, 3 रोजी सकाळी 10 वाजता कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या पुण्यस्मरणानिमित्त अभिवादन सभा व लेवा गणबोली दिवस झाला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.पी.फालक अध्यक्षस्थानी होते. प्रमुख अतिथी म्हणून प्रा.डॉ.अंजली पाटील उपस्थित होत्या.
प्रास्ताविक डॉ.संजय बाविस्कर यांनी केले. बहिणाबाईंच्या ओव्यांमध्ये असलेले जीवनाचे तत्वज्ञान, मानवी स्वभाव आणि मानवी मूल्यांची, अध्यात्मिक पातळीवरील ओव्यांविषयीचे वेगवेगळी उदाहरणे त्यांनी कथन केली. कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या प्रतिमेस प्राचार्य डॉ.आर.पी.फालक यांच्याहस्ते पुष्पांजली अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमात स्वराज तायडे, अजय व्यास, नेहा देऊळकर यांनी बहिणाबाईंच्या कविता सादर केल्या. दिव्या शिवपुजे या विद्यार्थ्यांनीने एकपात्री प्रयोग सादर केला.
लेवा गणबोलीचे महत्त्व वाढले
प्राचार्य आर.पी.फालक यांनी कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या व्यक्तीमत्वाची महती व्यक्त करतांना खान्देशकन्या बहिणाबाईं चौधरी यांच्या काव्याच्या माध्यमातून खान्देश परिसराचे नांव वैश्विक पातळीवर पोहचल्याने मराठी माणसाची आणि लेवा गणबोलीचे महत्त्व वाढल्याचे सांगितले. सूत्रसंचालन प्रा.डॉ.माधुरी पाटील तर आभार डॉ.जगदीश चव्हाण यांनी मानले. यशस्वीतेसाठी प्रा.श्रेया चौधरी, डॉ.जयश्री सरोदे, डॉ.अनिल सावळे, डॉ.आर.बी.ढाके, प्रा.एस.डी.चौधरी, प्रा.डॉ.जी.पी.वाघुळदे, प्रा.आर.डी.भोळे, प्रा.संगीता धर्माधिकारी, प्रा.एस.एस.पाटील, प्रा.निर्मला वानखेडे, प्रा.जागृती सरोदे, प्रा.खेमचंद धांडे तसेच विद्यार्थी व शिक्षकेत्तर कर्मचार्यांनी परिश्रम घेतल्याचे प्रसिद्धी प्रमुख प्रा.डॉ.एस.डी.चौधरी कळवतात.