तीन लाखांची लाच भोवली : जळगावातील आरटीओ अधिकारी दीपक पाटीलसह पंटर एसीबीच्या जाळ्यात


Three lakhs bribe: RTO officer Deepak Patil from Jalgaon along with punter in ACB’s net जळगाव (5 डिसेंबर 2024) : नवापूर चेक पोस्टवर बदली करण्याचा मोबदला म्हणून आपल्याच विभागाच्या निरीक्षकाकडून तीन लाखांची लाच खाजगी पंटराच्या माध्यमातून स्वीकारल्यानंतर जळगाव जिल्हा प्रादेशिक परिवहन अधिकार्‍यासह एका खासगी पंटरास छत्रपती संभाजी नगर एसीबीच्या पथकाने अटक केल्याने लाचखोरांमध्ये प्रचंड खळबळ उडाली. दीपक अण्णा पाटील (56) असे अटकेतील प्रादेशिक परिवहन अधिकार्‍याचे तर भिकन मुकुंद भावे (52, रा.आदर्श नगर प्लॉट, नं.98, जळगाव) असे खाजगी पंटराचे नाव आहे.

असे आहे लाच प्रकरण
55 वर्षी तक्रारदार हेदेखील आरटीओ अधिकारी असून त्यांची नोव्हेंबर महिन्यात नवापूर चेक पोस्टवर बदली करण्यात आल्यानंतर त्या मोबदल्यात
जळगाव प्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील यांनी भिकन भावे नावाच्या खाजगी पंटराच्या माध्यमातून 4 नोव्हेंबर रोजी तीन लाख रुपयांची लाच मागितली होती मात्र अधिकार्‍याची लाच द्यावयाची नसल्याने अधिकार्‍याने छत्रपती संभाजीनगर विभागीय लाचलुचपत विभागाकडे तक्रार केल्यानंतर सापळा रचण्यात आला. तक्रारदाराकडून भावे यांनी मेहरुण तलावाजवळील लेक अपार्टमेंटमध्ये गुरुवारी सायंकाळी लाच रक्कम स्वीकारताच त्यास अटक करण्यात आली व नंतर प्रादेशिक अधिकारी दीपक पाटील यांना त्यांच्या कार्यालयातून ताब्यात घेण्यात आले. दोघा आरोपींविरोधात एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

मोठे घबाड हाती लागण्याची शक्यता
प्रादेशिक अधिकारी दिपक पाटील यांच्या कोल्हापूर, ठाणे, सांगली ,नगर येथील घरांची देखील चौकशी सुरू असल्याची माहिती तपास अधिकार्‍यांनी दिली असून त्यात काय सापडले याची माहिती कळू शकली नाही.

यांनी केला सापळा यशस्वी
पोलीस उपअधीक्षक सुरेश नाईकनवरे यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक अमोल धस, हवालदार अशोक नागरगोजे, युवराज हिवाळे, विलास चव्हाण सचिन बारसे, सी.एन.बागुल आदींच्या पथकाने हा सापळा यशस्वी केला.


कॉपी करू नका.