लाडकी बहिण योजनेच्या अर्जांची छाननीचा कुठलाही निर्णय नाही : आमदार आदिती तटकरे


मुंबई (9 डिसेंबर 2024) : लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची छाननी करून त्यातील महिलांची संख्या कमी करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात असून या संदर्भात आमदार आदिती तटकरे यांनी मोठे दिलासा देणारे वक्तव्य केले आहे. लाडकी बहिण योजनेच्या अर्जाची छाननी करण्याचा कोणताही निर्णय झालेला नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदार आदिती तटकरे म्हणाल्या आहेत. मी या खात्याची मंत्री असेपर्यंत असा कोणताही निर्णय झाला नसल्याचे त्या म्हणाल्या.

निकषात बसणार्‍यांनाच मिळाले पैसे
आदिती म्हणाले की, लाडकी बहिण योजनेचा जीआर काढला त्यावेळी त्यात काही नियम दिले गेले होते. त्या नियमानुसारच सर्व महिलांना योजनेचा लाभ देण्यात आला. सर्व निकषांमध्ये बसणार्‍या महिलांनाच लाडकी बहिण योजनेचे पैसे देण्यात आले असल्याचा दावा देखील त्यांनी केला.

अडीच कोटी लाभार्थी
लाडक्या बहिणी संदर्भात नियम बदलले जाणार असल्याच्या अफवा पसरवल्या जात असल्याचे देखील तटकरे यांनी म्हटले आहे. एका घरातल्या केवळ दोन महिलांना लाडकी बहिण योजनेचा लाभ दिला जाईल, अशा प्रकारचा कोणताच नियम नसल्याचे देखील तटकरे यांनी म्हटले आहे. राज्यांमध्ये अडीच कोटी पर्यंत लाभार्थी असू शकतात, असे आम्ही सुरुवातीपासून म्हटले होते. सध्या दोन कोटी 34 लाख महिलांना या योजनेचा लाभ मिळत असल्याचा दावा तटकरे यांनी केला.

अर्थसंकल्पानंतर 2100 रुपयांचा लाभ
पुढील अर्थसंकल्पीय अधिवेशनात महिलांना 2100 रुपयांचा लाभ देण्याचे महायुतीने कबूल केले आहे. त्यानुसार अर्थसंकल्पीय अधिवेशनात त्याची घोषणा करणार असल्याचे देखील तटकरे म्हणाल्या.


कॉपी करू नका.