शिरपुर तालुका पोलिसांची दमदार कामगिरी : हाडाखेड चेक पोस्टवर सव्वापाच लाखांची अवैध दारू जप्त

पोलिसाांना पाहताच कंटेनर चालक पसार ; वाहन क्रमांकावर आता मालकाचा शोध


Strong performance by Shirpur Taluka Police : Illegal liquor worth Rs. 5.25 lakh seized at Hadakhed check post शिरपूर (17 डिसेंबर 2024) : मध्यप्रदेश निर्मिती मद्याची अवैधरित्या तस्करी होत असलयाची माहिती शिरपूर तालुका पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळाल्यानंतर त्यांनी हाडाखेड चेकपोस्टवर कारवाई करीत 15 लाखांचा कंटेनर व त्यातील पाच लाख 26 हजार 452 रुपये किंमतीचा अवैध मद्यसाठा जप्त केला. नाकाबंदी पाहताच संशयीत चालकाने अंधारात कंटेनर सोडून पळ काढला.

गोपनीय माहितीवरून कारवाई
शनिवार, 14 रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास शिरपूर तालुका पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना मध्यप्रदेशातील सेंधवाकडून धुळ्याकडे कंटेनर क्र.(एच.आर. 55 ए.ए.5036) मधून अवैधरित्या दारुची चोरटी वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी हाडाखेड चेक पोस्टजवळ नाकाबंदी लावली. रविवार, 15 रोजी रात्री 2.30 वाजेच्या सुमारास कंटेनर आल्यानंतर पथकाने चालकाला थांबण्याचा इशारा केला मात्र चालकाने काही अंतरावर वाहन थांबवून अंधारात पळ काढला.

महागडी दारू, बिअरचे बॉक्स जप्त
पोलीस ठाण्यात वाहन आल्यानंतर त्यातून ट्युबर्ग बिअर, ऑल सिझन रिझर्व व्हिस्की, रॉयल जनरल व्हिस्की, रॉयल चॅलेंज फाईन रिझर्व व्हिस्की अशा विदेशी दारुचे बॉक्स जप्त करण्यात आले. पोलिसांनी कारवाईमध्ये 15 लाखांचे वाहन तसेच त्यातील पाच लाख 26 हजार 452 रुपयाची विदेशी दारु असा 20 लाख 26 हजार 452 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. अज्ञात चालकाविरोधात गुन्ह दाखल करण्यात आला.

यांच्या पथकाने केली कारवाई
ही कारवाई धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, हवालदार संतोष पाटील, कर्मचारी स्वप्निल बांगर, संजय भोई, योगेश मोरे, धनराज गोपाल, सुनील पवार आदींच्या पथकाने केली. तपास पोलीस उपनिरीक्षक मिलिंद पवार करीत आहेत.


कॉपी करू नका.