रेल्वेत आठ वर्षांपासून तळ ठोकून बसलेल्या कर्मचार्यांच्या बदल्या करा : रेल्वे बोर्डाच्या जीएम, डीआरएम यांना सूचना
भुसावळ (19 डिसेंबर 2024) : रेल्वे प्रशासनात एकाच जागेवर गेल्या 8 ते 10 वर्षांपासून जे कर्मचारी, अधिकारी ठाण मांडून आहे, त्यांचा आढावा घेवून त्यांच्या बदल्या कराव्यात, या आशयाचे आदेश भारतीय रेल्वेचे महाव्यवस्थापक सतीश कुमार यांनी काढल्याने कर्मचारी वर्तुळात खळबळ उडाली आहे.
आता बदलीची गदा
एकाच ठिकाणी तळ ठोकलेल्यांवर आता बदलीची गदा राहणार आहे. रेल्वेतील संवेदनशील पदावर असलेल्या अधिकारी व कर्मचारी हे गेल्या 8 ते 10 वर्षांपासून एकाच जागेवर आहेत, अश्यांच्या आढावा घेऊन त्याच्या बदल्या कराव्यात, या आशयाचे पत्र रेल्वे बोर्डाकडून मध्य रेल्वेचे जीएम यांना आले आहे. भारतीय रेल्वेतील सर्वच जीएम यांना हे पत्र आले असून त्याची अंमलबजावणी करण्याच्या सूचना केल्या आहे. या बदलीबाबत सूचना वेळोवेळी जारी करण्यात आल्या आहेत. अशा पदांसाठी कालावधी ठरवून संबंधित मार्गदर्शक तत्त्वे यापूर्वी रेल्वे बोर्डाने दिले आहेे. जीएम यांनी त्यांच्या स्तरावर पदाचा आढावा घ्यावा आणि प्रभावी प्रशासनासाठी वरील सूचनांचे पालन करावे, अधिकारी आणि कर्मचारी यांचे रोटेशन सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक पावले उचलावीत, अश्या सूचना सतीशकुमार यांनी दिल्या आहे.