रायसोनी नगरात बंद घरातून 69 हजारांचा मुद्देमाल लांबवला


जळगाव (5 जानेवारी 2025) : जळगावातील रायसोनी नगरात बंद घराला टार्गेट करीत चोरट्यांनी रोख रकमेसह सोन्याचे व चांदीचे दागिने मिळून 69 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल लांबवला. या संदर्भात रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

काय घडले नेमके ?
इंदुबाई तात्याबा पाटील (65, रा.जिजामाता चौक, रायसोनी नगर, जळगाव) या वृद्ध महिला वास्तव्याला आहेत. 31 डिसेंबर ते 3 जानेवारी दरम्यान वृद्ध महिलेचे घर बंद असल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी त्यांचे बंद घराचे दरवाजाचे कुलूप तोडून घरातील लोखंडी कपाटातून 30 हजार रुपयांची रोकड, सोन्याचे व चांदीचे दागिने असा एकूण 69 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला.


ही घटना शुक्रवारी 3 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजता समोर आली. वृद्ध महिलेने रामानंदनगर पोलिसात धाव घेऊन तक्रार दिल्यावरून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस कॉन्स्टेबल जितेंद्र राजपूत हे करीत आहे.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !