जळगावातील मराठा विद्या प्रसारक मंडळ दस्तावेज प्रकरण : अॅड.प्रवीण चव्हाणांसह तिघांच्या जामिनावर 15 रोजी सुनावणी
जळगाव (8 जानेवारी 2025) : जळगावातील मराठा प्रसारक मंडळाच्या दस्तावेज चोरी व बनावट कागदपत्र तयार केल्याप्रकरणी जळगाव जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात जळगावच्या कवयित्री बहिणाबाई चौधरी त्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलसचिव विनोद पाटील, विशेष सरकारी वकील अॅड.प्रवीण चव्हाण, संजय भास्कर पाटील यांच्या जामीनावर सोमवारी कामकाज झाले. दरम्यान, आरोपींच्या वकिलांनी वेळ मागितल्याने आता 15 रोजी सुनावणी होणार आहे.
काय घडले न्यायालयात
सरकार पक्षातर्फे सीबीआयचा क्लोज रिपोर्ट व विविध ठिकाणी केलेल्या तकारीच्या प्रती न्यायालयात सादर करण्यात आल्या. आरोपीच्या वकिलांनी वेळ मागून घेतल्याने आता या प्रकरणी 15 तारखेला पुढील सुनावणी होणार आहे. न्या.वावरे यांच्या न्यायालयात ही सुनावणी झाली.


15 रोजी होणार सुनावणी
मूळ फिर्यादी निलेश भोईटे यांच्यातर्फे न्यायालयात अॅड.कुणाल पवार यांनी वकिलपत्र सादर केले. या प्रकरणात नियुक्त झालेले विशेष सरकारी वकील अॅड.सुशील अत्रे यांनी परवानगी अर्ज सादर केला. त्यासोबत सहकार पक्षातर्फे मविआ प्रकरणाची चौकशी केल्यानंतर सीबीआयने दिलेला क्लोज रिपोर्ट आणि भोईंटेतर्फे दाखल गुन्ह्याची प्रत, पोलीस अधीक्षक कार्यालय व विद्यापीठ कुलगुरू यांच्याकडे सादर केलेल्या प्रती न्यायालयात सादर करण्यात आल्या. संशयीत आरोपींचे वकील अॅड.प्रकाश बी.पाटील यांनी यावर अभ्यास करण्यासाठी न्यायालयाकडे मुदत मागितल्याने 15 रोजी आता सुनावणीची तारीख ठेवण्यात आली आहे.





