मस्साजोग सरपंच स्व.संतोष देशमुख यांच्या परिवारासह सरपंचांना शासनाने न्याय द्यावा : सरपंच सुषमा देसले
मुंबई (9 जानेवारी 2025) : बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्राच्या सरपंच परिषदेने मंगळवारी मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन केले. यावेळी उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष सुषमा देसले-पाटील यांनी सरपंच स्व.संतोष देशमुख यांच्या परिवारासह सरपंचांना न्याय देण्यासाठी शासनाने कठोर पाऊले उचलावीत, अशी मागणी केली.
सर्व आमदार मंत्री यांना पदावर बसवण्यात सरपंच यांची महत्वाची भूमिका असल्याने या पदाला न्याय द्यावा तसेच खूनातील आरोपींना झाली पाहिजे, अशी मागणी सुषमा देसले-पाटील यांनी केली. मंगळवार, 7 जानेवारी रोजी आझाद मैदानावर अध्यक्ष दत्ताभाऊ काकडे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले.