भुसावळच्या धरती चौधरीला एमसीजे अभ्यासक्रमात सुवर्णपदक
भुसावळ (9 जानेवारी 2025) : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा 33 वा दीक्षांत समारंभ बुधवार, 8 जानेवारी रोजी सकाळी दीक्षांत सभागृहात राज्यपाल व विद्यापीठ कुलपती सी.पी.राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी एमसीजे अभ्यासक्रमात सुवर्णपदक पटकावणर्या भुसावळातील धरती चंद्रकांत चौधरीला सुवर्णपदक देवून सन्मानीत करण्यात आले.
यावेळी प्रा. एम.जगदीश कुमार यांचे दीक्षांत भाषण झाले तर कुलगुरू प्रा.व्ही.एल. माहेश्वरी यांच्या उपस्थितीत राज्यपालांच्या हस्ते विद्यार्थ्यांना सुवर्णपदके प्रदान करण्यात आले. धरती ही पुणे येथे नोकरीस आहे. महाराष्ट्र राज्य बालकल्याण समितीचे जनरल सेक्रेटरी व महाराष्ट्र राज्य सर्वोदय मंडळाचे जनरल सेक्रेटरी, दी एज्युकेशन सोसायटी थोरगव्हाणचे अध्यक्ष चंद्रकांत चौधरी यांची कन्या आहे.