जळगावात बंद घर फोडले : 66 हजारांचा मुद्देमाल चोरीला
जळगाव (11 जानेवारी 2025) : बंद घराच्या दरवाजाचे कुलूप, कोंडा तोडून चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने, असा एकूण 66 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.
शहरातील गाडगेबाबा चौकाजवळ देवेंद्र नगरात ही घटना 24 डिसेंबर ते 6 जानेवारी रोजी सकाळी सहा वाजेदरम्यान घडली. नंदकुमार प्रल्हाद कुलकर्णी (वय 73, सेवानिवृत्त, रा.देवेंद्रनगर) यांच्या तक्रारीनुसार या प्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. तपास साहाय्यक फौजदार संजय सपकाळे हे करीत आहेत.







