जळगाव नवीन बसस्थानकातून मुलीला पळविले
जळगाव (11 जानेवारी 2025) : सोळा वर्षीय मुलगी तिच्या कुटुंबीयांसोबत असताना संशयिताने फूस लावून तिला पळवून नेले. मंगळवार, 7 रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास ही घटना नवीन बसस्थानकावर घडली.
कुटुंबातील सदस्यांनी सर्वत्र शोध घेतला असता मुलीचा तपास लागला नाही. या प्रकरणी तक्रारीनुसार बुधवार, 8 रोजी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. तपास पोलीस उपनिरीक्षक दादासाहेब वाघ हे करीत आहेत.







