जळगावात भरधाव दुचाकीची मोपेडला धडक


जळगाव (11 जानेवारी 2025) : भरधाव वेगातील दुचाकीने मोपेडला धडक दिली. या अपघातात डॉ. रितेश नाथानी यांचे वडील घनश्यामदास नाथानी हे जखमी झाले. मंगळवार, 7 रोजी दुपारी पावणेतीन वाजेच्या सुमारास डॉ. नाथानी व त्यांचे वडील असे दोघे मोपेडने घरी जात होते. शासकीय रुग्णालयाच्या रोडवर सेवा मंडळ सिंधी कॉलनीजवळ ही घटना घडली. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. तपास पोलीस हवालदार ईश्वर लोखंडे हे करीत आहेत.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !