टास्क देत तरुणाला पाच लाखात गंडवले
जळगाव (12 जानेवारी 2025) : 24 वर्षीय तरुणाशी 4 जानेवारी ते 6 जानेवारी 2025 दरम्यान सोशल मीडियावरील टेलिग्राम साईटवरील रुची शर्मा, दीपशिखा रावत, दीप्पी राजवीर सिंग, सुमन ग्रोवर या महिला सायबर ठगांनी टेलिग्राम सोशल मीडिया साइटवरून वारंवार संपर्क केला. त्याच्याशी छान बोलत त्याचा विश्वास संपादन केला. दिलेले टास्क पूर्ण करून गुंतवणूक केल्यास त्यावर तुम्हाला अधिक नफा (बोनस) प्राप्त करून देतो, अशा थापा मारल्या. त्यानंतर तरुणाच्या खात्यातून वेळोवेळी 5 लाख 32 हजार 688 रुपयांची रक्कम ऑनलाइन स्वीकारली.
यानंतर संपर्क बंद केला. तरुणाला कोणताही मोबदला दिला नाही. मात्र तरुणाच्या खात्यातील बँक बॅलेन्स घेत ते रिकामे केले. आर्थिक फसवणूक झाल्याची खात्री झाल्यानंतर तरुणाने सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी शुक्रवार, 10 रोजी गुन्हा दाखल झाला. तपास सायबर पोलीस निरीक्षक सतीश गोराडे हे करीत आहेत.

