मध्यप्रदेशातील कुविख्यात दुचाकी चोरटा एमआयडीसी पोलिसांच्या जाळ्यात


जळगाव (14 जानेवारी 2025) : एमआयडीसी पोलिसांनी मध्यप्रदेशातील विजय श्रीराम बारेला (24, धुरकुट, ता.भगवानपुरा) यास दुचाकी चोरीप्रकरणी अटक केली आह.े आरोपीविरोधात दुचाकी चोरीचे विविध पोलीस ठाण्यात दहा गुन्हे दाखल आहेत.

दुचाकी चोरी प्रकरणी अटक
भिकन दामु बोरसे (58, रा.देविदास कॉलनी, जुना मेहरुण रोड) हे सलुन काम करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. 10 डिसेंबर 2024 रोजी रात्री रात्री 7.30 वाजेच्या सुमारास त्यांची दुचाकी देविदास कॉलनी मिहीर मेडीकल समोर रस्त्यावरुन चोरट्याने चोरुन नेली. सोमवार, 13 डिसेंबर रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दुचाकी चोरी संदर्भात गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पथकाने शोध घेत विजय बारेला याला 11 जानेवारी रोजी सायंकाळी ताब्यात घेतले. पोलीस कोठडीत असताना त्याची विचारपूस केली असता त्याने या गुन्ह्याची पोलिसांना कबुली देत चोरीची दुचाकी काढुन दिली. ही दुचाकी पोलिसांनी त्याच्याकडुन हस्तगत केली.


यांनी केली कारवाई
पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे, पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत झनके, हवालदार गणेश शिरसाळे, नाईक विकास सातदिवे, किशोर पाटील, योगेश बारी यांनी ही कारवाई केली. तपास पोलीस नाईक विकास सातदिवे करीत आहेत.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !