जळगावात पतंग उडवीताना तोल गेल्याने बालक जखमी
जळगाव (14 जानेवारी 2025) : जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरातील गणपती सिद्धिविनायक मंदिराजवळ राहणार्या एका 7 वर्षीय चिमुकला पतंग उडवताना दुसर्या मजल्यावरून खाली पडल्याने गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास घडली आहे. त्याला खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
तोल जावून पडल्याने बालक जखमी
जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनी भागातील गणपती सिद्धिविनायक मंदिराजवळ श्लोक कैलास गिरगुणे हा 7 वर्षीय बालक आपला कुटुंबासह वास्तव्याला आहे. दरम्यान तो त्याचा जुडवा भावासोबत मंगळवारी राहत्या घराच्या दुसर्या मजल्यावर पतंग उडवित होता. त्यावेळी त्याचा तोल जाऊन तो दुसर्या मजल्यावरून खाली पडला. या अपघातात तो गंभीररित्या जखमी झाल्याने त्याला जळगाव शहरातील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.







