चाळीसगावातील कुविख्यात गुन्हेगार नागपूरात स्थानबद्ध
Notorious criminal from Chalisgaon arrested in Nagpur चाळीसगाव (15 जानेवारी 2025) सामाजिक शांततेला अडसर ठरू पाहणार्यांविरोधात चाळीसगाव शहर पोलिसांकडून सातत्याने कारवाई सुरू आहे. पोलिसांच्या रेकॉर्डवरील कुविख्यात गुन्हेगार दानिश शेख असलम (29, रा.नागदरोड, चाळीसगाव) यास स्थानबद्ध करण्याचे आदेश जिल्हाधिकार्यांनी काढताच संशयीताला नागपूरात स्थानबद्ध करण्यात आले
गंभीर स्वरुपाचे गुन्हे
दानिश शेख असलम विरोधात चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गैरकायद्याची मंडळी जमवणे, मारहाण करून लोकांकडुन दमबाजी करुन पैसे वसुल करणे व इतर गुन्हे दाखल होते. वेळोवेळी कारवाई करूनही त्याच्या कृतीत बदल होत नसल्याने चाळीसगाव शहर पोलिसांनी स्थानबद्धतेचा प्रस्ताव जिल्हा पोलीस अधीक्षकांमार्फत जिल्हाधिकार्यांकडे सादर केला. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी या संदर्भात आदेश काढताच 14 रोजी संशयीताला नागपूरात स्थानबद्ध करण्यात आले.


यांनी केली कारवाई
जळगाव अधीक्षक महेशकुमार रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, पोलीस उपअधीक्षक राजेशसिंह चंदेल यांच्या नेतृत्वात चाळीसगाव पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रेडेड उपनिरीक्षक कैलास पाटील, सुभाष पाटील, हवालदार विनोद पाटील, भूपेश वंजारी, दीपक पाटील आदींनी ही कारवाई केली.





