खेडी शिवारात चोरट्यांचा धुमाकूळ : तीन बंद घरातून लाखोंचे दागिने लंपास
Thieves in the village of Shivara : Jewelry worth lakhs stolen from three locked houses जळगाव (16 जानेवारी 2025) : एकाच ठिकाणी असलेल्या तीन कुलूपबंद घरांना चोरट्यांनी लक्ष्य करून फोडले. घरातील कपाटात ठेवलेले सोने व चांदीचे दागिने हाती लागताच चोरटे रफुचक्कर झाले. शहरालगत खेडी शिवारात शिवनगर सीताराम शंभू रेसिडेन्सी या ठिकाणी सोमवार 13 रोजी सायंकाळी साडे सहा वाजेपुर्वी चोरट्यांनी या घरातून 2 लाख 92 हजार 700 रुपयांचे सोन्याचांदीचे दागिने घेत ही घरे रिकामी केले.
वाढत्या चोर्यांनी नागरिक भयभीत
रवींद्र जगन्नाथ मगरे (48, रा. प्लॉट न.26, शिव नगर) हे व्यापारी असुन कुटुंबासह याठिकाणी वास्तव्य करतात. सोमवारी कार्यक्रमानिमित्त मगरे यांच्यासह शेजारील घराच्या दरवाजाला कुलूप लावून घराबाहेर पडले. त्यांनतर चोरट्यांनी या रेसिडेन्सीमध्ये शिरकाव केला. घरात एन्ट्री करत चोरट्यांनी कपाटे फोडली. सामान अस्तव्यस्त करुन किंमती वस्तू शोधल्या. मुद्देमाल हाती लागताच चोरटे या ठिकानातून पसार झाले.


रवींद्र मगरे यांच्या घरातून चोरट्यांनी 40 हजार रुपये किमतीची सोन्याची मंगल पोत,18 हजार किमतीची 5 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र,18 हजार किमतीचे 5 ग्रॅमचे टोंगल,22हजाराचे सोन्याचे कानातले चंद्रकांत, 18हजाराच्या सोन्याच्या बाह्या, सोन्याची 5 ग्रॅम ची पटी कानातील, कानातील फॅन्सी, सोन्याची चैन, सोन्याच्या अंगठ्या, पायातील बीचवी, उभार असा एकुण 2लाख 17 हजाराचा मुद्देमाल नेला.
याच ठिकाणी राजेश सीताराम पाली यांचेही घर चोरट्यांनी फोडले. घरातील लाकडी कपाटात ठेवलेल्या पेटीतील 35 हजार किमतीची 10 ग्रॅम वजनाचे सोन्याची मंगल पोत,1500 रुपये किमतीचे 20 ग्रॅम चांदीचे शिक्के, 1200रुपये किमतीचे पायातील उभार असा एकुण 37 हजार 700 चा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला.भगवान बाबुराव माळी यांच्या घरात एंट्री करत चोरट्यांनी लोखंडी कपाट फोडले. कपाटात ठेवलेले 28 हजार रुपये किमतीची 8ग्रॅम वजनाची सोन्याची चीप,10 हजार किमतीच्या 2.50 भार चांदीच्या साकल्या असा 38 हजाराचा मुद्देमाल नेला. या तीन घरातून दोन लाख 92 हजार 700 रुपयांचे दागिने चोरट्यांनी नेले.
याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रारीनुसार 14 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे हे करीत आहेत.





