जळगावात ट्रॅक्टरच्या धडकेत ममुराबादचा दुचाकीस्वार जागीच ठार


A bike rider from Mamurabad died on the spot after being hit by a tractor in Jalgaon. जळगाव (17 जानेवारी 2025) : समोरून सिमेंट भरून येणार्‍या ट्रॅक्टरने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीस्वार विलास रामसिंग भील (50, रा.ममुराबाद) यांचा जागीच मृत्यू झाला. गुरुवार, 16 रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास ही घटना ममुराबाद रस्त्यावर एका हॉटेलजवळ घडली.

अपघाताची मालिका कायम
हातमजुरी करून विलास भील हे कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. ते जळगावहून दुचाकीने (क्रमांक एम.एच. 19 ए. के. 0381) घरी ममुराबाद येथे जात होते. सिमेंट भरलेले ट्रॅक्टर (क्रमांक एम. एच. 19 टी. ए. 3375) चालक भरधाव वेगाने आणत असताना त्याने दुचाकीला जबर धडक दिली. खाली पडल्याने डोक्याला जोराचा मार लागल्याने विलास भील यांचा जागीच मृत्यू झाला. ही माहिती कळताच तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. रुग्णवाहिका बोलावून मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविला. मयताच्या पश्चात पत्नी, मुली, मुलगा असा परिवार आहे. ही माहिती कळताच मयताच्या कुटुंबासह नातेवाईकांना जबर धक्का बसला.


दरम्यान, शिव कॉलनीजवळील रेल्वे उड्डाणपुलावर अज्ञात अवजड वाहनाने दुचाकीस्वाराला चिरडल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा दुसरा अपघात घडल्याने हळहळ व्यक्त करण्यात आली.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !