जळगाव तरुणाच्या खुनाने हादरले : हल्ल्ल्यात पाच जण जखमी
Jalgaon shaken by murder of youth : Five people injured in attack जळगाव (19 जानेवारी 2025) : नववर्षात गुन्हेगारांनी शहरात डोके वर काढत केलेल्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू झाला तर कुटूंबातील पाच जण जखमी झाले. रविवार, 19 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास घडलेल्या या प्रकारानंतर शहात खळबळ उडाली. मुकेश रमेश शिरसाठ (26, रा.पिंप्राळा हुडको, जळगाव) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. जखमी पाच जणांवर जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत.
काय घडले नेमके ?
जळगाव शहरातील पिंप्राळा हुडको परिसरात राहणार्या मुकेश रमेश शिरसाठ या तरुणाचा काही महिन्यांपूर्वी परिसरातील तरुणांशी वाद झाला होता. जुन्या वादातून शनिवारी रात्री दोघांमध्ये पुन्हा बाचाबाची झाली होती. रविवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास शिरसाठ कुटुंबावर सात ते आठ जणांनी चॉपर, कोयता, चाकू आणि लाकडी काठी जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यामध्ये निळकंठ सुखदेव शिरसाट (45), कोमल निळकंठ शिरसाठ, करण निळकंठ शिरसाठ (25), ललिता निळकंठ शिरसाठ (30) आणि सनी निळकंठ शिरसाठ (21, सर्व रा.पिंप्राळा हुडको, जळगाव) हे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. मुकेश रमेश शिरसाठ (26) या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात त्यांच्या नातेवाईकांनी एकच आक्रोश केला होता. वैद्यकीय महाविद्यालयात मित्र परिवारासह नातेवाईकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली. खुनानंतर रामानंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेतली तसेच जिल्हा रुग्णालयात पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला.