साकळी गावातील गोदामातून एक लाख 65 हजारांचा गुटखा जप्त


Gutkha worth Rs 1.65 lakh seized from a warehouse in Sakli village यावल (19 जानेवारी 2025) : यावल तालुक्यातील साकळी या गावातील एका गोदामात प्रतिबंधीत गुटखा असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा टाकत एक लाख 65 हजार 976 रुपयांचा गुटखा जप्त केला. यावल पोलीस ठाण्यात शनिवारी एका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

गोपनीय माहितीवरून कपरवाई
साकळी गावातील भोनक नदीच्या काठावर चिंटू वाणी याच्या गोदामामध्ये प्रतिबंधित गुटखा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरे, सहायक फौरदार असलम खान, सहायक फौजदार अर्जुन सोनवणे, पोलीस नाईक मोहसीन खान, अनिल साळुंखे, अरशद गवळी, मुकेश पाटील, राजेंद्र पाटील या पथकाला त्या ठिकाणी जाऊन छापा टाकला व प्रतिबंधीत एक लाख 65 हजार 976 रूपयाचा गुटखा तेथून जप्त केला.

याप्रकरणी यावल पोलिसात हवालदार योगेश गोसावी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरे करीत आहे.


कॉपी करू नका.