नायगाव गावात ट्रॅक्टरचा धक्का लागल्याने दुचाकीस्वार जखमी


Biker injured after being hit by tractor in Naigaon village यावल (19 जानेवारी 2025) : यावल तालुक्यातील नायगाव येथील किनगाव रोडवर असलेल्या स्मशानभूमी जवळ ट्रॅक्टरचा धक्का लागल्याने दुचाकीस्वार तरूण जखमी झाला. अपघात प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अज्ञात ट्रॅक्टर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

काय घडले नेमके
किनगाव रस्त्यावरील स्मशानभूमी जवळून मोटरसायकल (क्रमांक एम.एच. 19 ए. जे. 7983) घेऊन गौरव संतोष पाटील-बाविस्कर (24, रा.नायगाव) हा तरुण जात असताना अज्ञात ट्रॅक्टर चालकाने धक्का दिला. या अपघातामध्ये तो जखमी झाला आणि मोटरसायकलचेदेखील नुकसान झाले. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अज्ञात ट्रॅक्टर चालकाविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी ट्रॅक्टर आणि ट्रॉली जप्त केली. तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक किशोर परदेशी करीत आहे.


कॉपी करू नका.