चाळीसगावच्या महिलेचे बस प्रवासात दीड लाखांचे दागिने लांबविले


Chalisgaon woman’s jewellery worth 1.5 lakh stolen during bus journey जळगाव (19 जानेवारी 2025) : बसमधून प्रवास करणार्‍या चाळीसगावातील महिलेच्या पर्समधुन चोरट्याने सोन्याचे दागिने, रोकड तसेच कपाटाच्या लॉकरची चाबी चोरुन पसार झाला. ही घटना धुळे-अमळनेर बसमध्ये शुक्रवार, 17 रोजी 11 ते दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

असे आहे चोरी प्रकरण
चाळीसगाव येथील 47 वर्षीय महिला अमळनेर येथे जाण्यासाठी एस.टी. बस ( क्रमांक एमएच 06 बीडब्ल्यू 0447) मधुन प्रवास करीत होत्या. त्यांच्या पर्समधुन चोरट्याने एक लाख 20 हजार किंमतीचे 40 ग्रॅम वजनाची सोन्याची माळ, 30 हजार किंमतीचे दहा ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, दोन हजाराची रोकड असा सुमारे एक लाख 52 हजारांचा मुद्देमाल लंपास केला. अमळनेर येथे प्रकार लक्षात आल्यानंतर महिलेने तक्रार दिली. गुन्ह्याचा तपास हवालदार प्रमोद पाटील हे करीत आहेत.


कॉपी करू नका.