नकारात्मक विचार बाजूला सारुन आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जा : आरती चौधरी

भुसावळातील के.नारखेडेत बारावीच्या विद्यार्थ्यांना निरोप


भुसावळ (25 जानेवारी 2025) : बारावीची परीक्षा आयुष्यात महवाचा टप्पा आहे. विद्यार्थ्यांनी परीक्षेला आत्मविश्वासाने सामोरे जावे तसेच मनातील नकारात्मक विचार बाजूला सकारात्मक विचार करून वेळेचे महत्व लक्षात घेवून अभ्यास करावा, असे आवाहन समुपदेशक आरती चौधरी यांनी येथे व्यक्त केले. के. नारखेडे विद्यालयात इयत्ता दहावी बारावीचा आशीर्वादपर समारंभ नुकताच झाला.

संस्था सेक्रेटरी पी.व्ही.पाटील, संस्थेचे ऑनररी जॉईंट सेक्रेटरी प्रमोद नेमाडे, प्रभारी मुख्याध्यापक वाय.एन.झोपे, पर्यवेक्षक सुनील राणे, संगणक विभाग प्रमुख भगवान पाटील उपस्थित होते. पी.व्ही.पाटील यांनी विद्यार्थ्यांना प्रामाणिकपणे व सचोटीने अभ्यास करण्याचे व यातून मिळणारे सुयश हे दीर्घकालीन असते, असे सांगितले. संस्थाध्यक्ष डॉ.मकरंद नारखेडे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा संदेश व आशीर्वाद दिला.

या संदेशाचे वाचन तसेच विद्यार्थ्यांनी परीक्षेला सामोरे जाताना घ्यावयाच्या दक्षता या संदर्भातील महत्त्वपूर्ण माहितीचे विवेचन शैलेंद्र वासकर यांनी केले. प्रेरणा चौधरी व लिसिका पाटील यांनी विद्यार्थी मनोगत व्यक्त केले तर अर्चना खाचणे यांनी शिक्षकांनी मनोगत व्यक्त केले. संगणक विभाग शिक्षिका सारिका भारंबे यांनी इयत्ता अकरावीच्या प्रवेशा संदर्भात महत्त्वपूर्ण माहिती सांगितली.
सूत्रसंचालन व्ही.एम.महाजन व एस.एन.राणे यांनी केले. प्रभारी मुख्याध्यापक वाय.एन.झोपे यांनी प्रास्ताविक तर अतिथींचा परिचय पी.एस पाटील यांनी दिला. आभार पर्यवेक्षक सुनील राणे यांनी मानले. यशस्वीतेसाठी एस.पी.पाठक, कांचन राणे, शैलेंद्र महाजन, माधव गरुडे, रीता महाजन, नेहा पाटील, प्रदीप सपकाळे यांनी परिश्रम घेतले.


कॉपी करू नका.