162 कोटींचा घोटाळा केल्याचा मंत्री धनंजय मुंडेंवर आरोप : अंजली दमानियांनी केली राजीनाम्याची मागणी
Minister Dhananjay Munde accused of committing a scam of Rs 162 crore: Anjali Damania demands his resignation मुंबई (3 फेब्रुवारी 2025) : कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर समाजवादी कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी गंभीर आरोप केल्याने राजकीय वर्तुळात खळबळउ डाली आहे. मुंडे यांच्या नेतृत्वाखाली 161.68 कोटी रुपयांचा घोटाळा झाला असून दमानिया यांनी तत्काळ मुंडे यांचा राजीनामा घेण्याची मागणी पत्रकार परिषदेत केली आहे.
काय म्हणाल्या दमानिया ?
दमानिया यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, मंत्री मुंडे यांचे धोरण आणि कामकाज शेतकर्यांच्या हितासाठी नाही, तर व्यक्तिगत फायदे मिळवण्यासाठी होते. 12 एप्रिल 2018 रोजीच्या जीआरनुसार सरकारने शेतकर्यांसाठी ऊइढ योजना सुरू केली होती. योजनेचा मुख्य उद्देश शेतकर्यांपर्यंत प्रत्यक्ष निधी पोहोचवणे होता. परंतु या योजनेंतर्गत शेतकर्यांना पैसे पोहोचत नसल्याची गंभीर चिंता दमानिया यांनी व्यक्त केली.
कृषीमंत्री मुंडे यांच्यावर घोटाळ्याचे आरोप
दमानिया यांचे आरोप असे आहेत की, मुंडे यांच्या नेतृत्वाखाली कृषी विभागाने किमतीच्या अत्यधिक दराने वस्तू खरेदी केल्या आणि शेतकर्यांचा पैसा गैरवापर केला. उदाहरणार्थ, 184 लिटरच्या नॅनो युरियाच्या बॉटलची किंमत साधारणतः 92 रुपये असताना, कृषीमंत्री मुंडे यांच्या आदेशानुसार ती 220 रुपयांना खरेदी करण्यात आली. याप्रकारे 19 लाख 68 हजार बॉटल्स 220 रुपयांनी खरेदी करण्यात आल्या. याचा एकूण घोटाळा 88 कोटी रुपयांचा झाला आहे. याशिवाय, 500 रुपयांच्या बॅटरी स्प्रेअरच्या बॉटल्सला 269 रुपयांऐवजी 590 रुपयांना खरेदी करण्यात आल्या, ज्यामुळे याही घोटाळ्याचा एकूण विचार केला जात आहे.
दमानिया यांनी सांगितले की, कृषी विभागाने बॅटरी स्प्रेअर खरेदीसाठी 3426 रुपयांमध्ये टेंडर काढले, जरी त्याच उपकरणाचा बाजार भाव 2450 रुपये असावा. या उपकरणांची एकूण खरेदीची किंमत जवळपास 2 लाख 36 हजार 427 बॅटरी स्प्रेअरच्या बाबतीत 3 हजार रुपयांच्या वर आहे.
राजीनाम्याची मागणी
अंजली दमानिया यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना आवाहन केले आहे की, धनंजय मुंडे यांच्यावर लावलेले आरोप गंभीर आहेत आणि त्यासाठी योग्य पद्धतीने तपास केला जावा. त्याचबरोबर, त्यांनी मुंडे यांचा तात्काळ राजीनामा घेण्याची मागणी केली आहे.