काय येड्यांचा बाजार आहे ? ; वर्षा बंगल्यावर न जाण्याच्या प्रश्नावर मुख्यमंत्री स्पष्टच म्हणाले.


मुंबई (4 फेब्रुवारी 2025) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्यांचे शासकीय निवासस्थान वर्षा बंगल्यावर रहायला गेले नसल्यान राज्याच्या राजकारणात विविध उलटसुलट चर्चा सुरू होत्या तर खासदार संजय राऊत यांनी धक्कादायक आरोप करीत खळबळ उडवून दिली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सगळ्या चर्चांवर उत्तर दिले आहे. बंगल्यावर किरकोळ दुरुस्तीची कामे सुरू असून मुलीची दहावीची परीक्षा झाल्यानंतर तेथे जाणार असल्याचे ते म्हणाले.

हा तर वेड्यांचा बाजार
एकनाथ शिंदे यांनी वर्षा बंगला सोडल्यानंतर त्या ठिकाणी मला जायचं आहे. त्यापूर्वी तिथे काही छोटी-मोठी काम चालू आहेत. माझी मुलगी दहावीच्या वर्गात आहे. 17 तारखेपासून तिची परीक्षा सुरू होणार आहे त्यामुळे ती म्हणाली की, माझी परीक्षा झाल्यानंतर आपण शिफ्ट होऊ. म्हणून मी त्या बंगल्यात राहायला गेलो नाही. परीक्षा झाल्यानंतर त्या ठिकाणी जाऊ पण इतक्या वेळा सारख्या चर्चा सुरू आहेत. मला तर वाटतं माझ्या स्तरावरील माणसांनी अशा चर्चांना उत्तरही देऊ नये अशा प्रकारच्या या चर्चा सुरू आहेत, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

मला वाटतं की अलिकडच्या काळात काही बाबतीत वेड्यांचा बाजार होतोय. माफ करा, पण स्पष्ट सांगतो. आज मी एका माध्यमांवर पाहिल की वर्षा पाडणार? काय वेड्यांचा बाजार आहे? वर्षा ही काय कोणाच्या घरची मालमत्ता आहे का?, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.


कॉपी करू नका.