रेल्वे प्रवाशांना दिलासा : होळीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेच्या विशेष चार गाड्या धावणार


Relief for railway passengers : Four special trains will run on the occasion of Holi भुसावळ (10 मार्च 2025) : रेल्वेने होळीच्या पार्श्वभूमीवर होणारी प्रवाशांची गर्दी टाळण्यासाठी मुंबई ते बनारस, पुणे ते दानापूर, लोकमान्य टिळक टर्मिनस ते दानापूर, मुंबई ते महू दरम्यान चार अतिरिक्त होळी विशेष रेल्वे गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या विशेष गाड्यांचा उद्देश प्रवाशांना सुरळीत प्रवास करण्यासाठी तसेच वेळेत गावी पोहोचता येणे हा आहे.

अशा धावणार रेल्वे गाड्या
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते बनारस होळी विशेष गाडी 13 मार्चला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून रात्री 10.30 वाजता सुटेल आणि बनारस येथे तिसर्‍या दिवशी पहाटे 5.15 वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासात विशेष गाडी 15 रोजी बनारस येथून सकाळी आठ वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे दुसर्‍या दिवशी दुपारी 1.30 वाजता पोहोचेल. पुणे ते दानापूर होळी विशेष गाडी 11 रोजी पुणे येथून संध्याकाळी 7.55 वाजता सुटेल आणि दानापूर येथे तिसर्‍या दिवशी पहाटे 4.30 वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी 13 रोजी दानापूर येथून सकाळी 6.30 वाजता सुटेल आणि पुणे येथे दुसर्‍या दिवशी संध्याकाळी 5.35 वाजता पोहोचेल. लोकमान्य टिळक टर्मिनस ते दानापूर होळी विशेष गाडी 10 रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सकाळी 10.30 वाजता सुटली असून दानापूर येथे दुसर्‍या दिवशी मंगळवारी संध्याकाळी 6.45 वाजता पोहोचणार आहे. परतीच्या प्रवासात मंगळवार, 11 रोजी दानापूर येथून रात्री 9.30 वाजता ही गाडी सुटणार असून लोकमान्य टिळक टर्मिनस येथे तिसर्‍या दिवशी पहाटे 4.50 वाजता पोहोचेल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते मऊ होळी विशेष गाडी 12 रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून रात्री 10.30 वाजता सुटेल आणि महू येथे तिसर्‍या दिवशी सकाळी 10.30 वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी 14 रोजी महू येथून संध्याकाळी पाच वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे तिसर्‍या दिवशी रात्री 12.40 वाजता पोहोचेल. प्रवाशांनी या गाड्यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.


कॉपी करू नका.