तळवेल शिवरात बेवारस तरुणाचा मृतदेह आढळला

भुसावळ (10 मार्च 2025) : भुसावळ तालुक्यातील तळवेल शेत-शिवारातील ग्रामपंचायतीच्या मालकीच्या शेतात एका तरुणाचा बेवारस कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. मृताची ओळख अद्याप पटलेली नाही. वरणगाव पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
भुसावळ तालुक्यातील तळवेल शेत-शिवरातील गट क्रमांक 265 मधील ग्रामपंचायतीच्या मालकीचे लिलाव पद्धतीने मक्त्याने करणार्या जितेंद्र विजय पाटील यांनी केलेल्या शेतात गहु लागवड केली आहे. रविवार, रोजी सकाळच्या सुमारास गव्हाला पाणी देण्यासाठी शेतात गेल्यानंतर 35 ते 40 वयोगटातील तरुणाचा अंगावर एकही कपडे नसलेला कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्यानंतर पोलीस पाटील यांना माहिती कळवण्यात आली. त्यांनी वरणगाव पोलिसांना खबर देतात घटनेचा पंचनामा करण्यात आला. पुढील तपास प्रमोद कंखरे करीत आहे. दरम्यान, तळवेल ते बोहर्डी रस्त्यावर वेडसर तरुण या रस्त्याने दहा दिवसांपूर्वी पायी फिरताना या बर्याच शेतकर्यांना दिसला होता व तो मृत असल्याची शंका आहे.


