बड्या घरच्या दिवट्यांची भर चौकात लघूशंका : पोलिसांनी धिंड काढत घडवली अद्दल


Large house lights filled the square, causing a slight suspicion : Police created chaos by making noise पुणे (10 मार्च 2025) : विद्येच्या माहेरघरात बड्या घरच्या दिवट्यांनी भर चौकात लघूशंका केली होती. याप्रकरणाचा व्हिडिओ व्हायरल होताच संतापाची लाट पसरताच आरोपींना अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या दोन तरुणांची पुणे पोलिसांनी सोमवारी धिंड काढली.

काय घडले पुणयात
येरवडा परिसरातील शास्त्रीनगर चौकात दारुच्या नशेत गौरव आहुजा (25, रा. एनआयबीएम रस्ता, कोंढवा) नावाच्या तरुणाने लघुशंका केली होती, तर भाग्येश ओसवाल (25, रा. मार्केट यार्ड) नावाचा मित्रही त्याच्यासोबत होता. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी याची गंभीर दखल घेत, दोघांविरोधात सार्वजनिक ठिकाणी अश्लील वर्तन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. आता आज पोलिसांनी या दोघांची शास्त्रीनगर चौकात नेऊन धिंड काढली. याचा व्हिडिओही समोर आला आहे.

गौरव आणि त्याचा मित्र भाग्येश यांना पोलिसांनी काल न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने दोघांनाही एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली होती. ही कोठडी संपल्यानंतर पोलिसांनी दोघांनाही आज आज न्यायालयात हजर केले. यावेळी पुणे सत्र न्यायालयाने गौरव आहुजाला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली तर भाग्येश ओसवाल याला न्यायालयीन कोठडी देण्यात आली.


कॉपी करू नका.