रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा : आठ साप्ताहिक विशेष रेल्वे गाड्यांना मुदतवाढ
Eight weekly special trains extended भुसावळ (25 मार्च 2025) : रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांच्या सोयीसाठी आणि प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता आठ विशेष रेल्वे गाड्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे.
मुदतवाढ मिळालेल्या गाड्यांमध्ये गाडी क्रमांक 09025 बलसाड-दानापूर साप्ताहिक विशेष ट्रेनला 23 जून 2025 पर्यंत तर गाडी क्रमांक 09026 दानापूर-बलसाड साप्ताहिक विशेष ट्रेन 01 जुलै 2025 पर्यंत वाढविण्यात आली आहे. गाडी क्रमांक 09045 उधना-पटना साप्ताहिक विशेष ट्रेन 27 जून 2025 पर्यंत तर गाडी क्रमांक 09046 पटना-उधना साप्ताहिक विशेष ट्रेन 28 जून 2025 पर्यंत, गाडी क्रमांक 09575 राजकोट-मेहबूबनगर साप्ताहिक विशेष ट्रेन 30 जून 2025 पर्यंत वाढविण्यात आली आहे. गाडी क्रमांक 09576 मेहबूबनगर-राजकोट साप्ताहिक विशेष ट्रेन 01 जुलै 2025 पर्यंत तर गाडी क्रमांक 09129 बांद्रा टर्मिनस-रिवा अनारक्षित साप्ताहिक विशेष ट्रेन 26 जून 2025 पर्यंत व गाडी क्रमांक 09130 रिवा-बांद्रा टर्मिनस अनारक्षित साप्ताहिक विशेष ट्रेन 27 जून 2025 पर्यंत वाढविण्यात आली आहे.







