श्री सनातनी मनुदेवी दुकानदार असोसिएशन स्थापन : अध्यक्षपदी विश्वदीप पाटील


यावल (11 एप्रिल 2025) : यावल तालुक्यातील आडगाव येथून जवळच असलेल्या सातपुड्याच्या कुशीतील श्री क्षेत्र मनुदेवी मंदिरावरील दुकानदारांनी श्री सनातनी मनुदेवी दुकानदार असोसिएशनची स्थापन करण्यात आली. या संघटनेच्या अध्यक्षपदी विश्वदीप पाटील तर उपाध्यक्षपदी किरण कोळी यांची निवड करण्यात आली.

असोसिएशनची स्थापना
श्री क्षेत्र मनुदेवी येथील दुकानदारांनी श्री सनातनी मनुदेवी दुकानदार असोसिएशनची स्थापना केली. स्थापन झालेल्या असोसिएशनची अधिकृत नोंदणी जळगाव येथील धर्मदाय आयुक्तांकडे करण्यात आली. ही असोसिएशन महाराष्ट्रात आजपर्यंत कुठल्याच धार्मिक स्थळांवर प्रस्थापित नसून ही मनुदेवी येथील व्यावसायीकांनी प्रथमच स्थापित केली आहे. अध्यक्षपदी विश्वदीप पाटील, उपाध्यक्ष किरण कोळी, सचिव कैलास पाटील तसेच सदस्य अमोल पाटील, निलेश पाटील, वामन पाटील, दीपक कोळी, वाल्मीक पाटील, गोपाल पाटील, शशिकांत कोळी, साहेबराव पाटील, दीपक पाटील, योगेश पाटील, योगेश वासुदेव पाटील यांची निवड करण्यात आली आहे. यात असोसिएशनचे अध्यक्ष विश्वदीप पाटील यांनी मंदिरावर व्यावसायीकांचा कायमस्वरूपीचा व्यवसाय हा ऐन यात्रोत्सवात अतिक्रमणधारक व्यावसायीक हिरावतात व नवीन दुकान स्थापित होऊ नये व दुकानदारांमध्ये एकता राहिली पाहिजे या अनुषंगाने ही असोसिएशन स्थापीत केल्याचे त्यांनी सांगितले.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !