यावल सबस्टेशनच्या ब्रेकरमध्ये बिघाड : सात गावांची वीज गुल


Breaker failure at Yaval substation: Power outage in seven villages यावल (11 एप्रिल 2025) : शहरातील सातोद रस्त्यावर असलेल्या राज्य विद्युत वितरण कंपनीच्या 132 केव्हीए सबस्टेशनमधील ब्रेकरमध्ये बुधवारी सकाळी तांत्रिक बिघाड निर्माण झाला परिणामी दुरुस्तीकरिता तीन सबटेशमधील वीजपुरवठा हा खंडित करण्यात आला होता. दरम्यान दीड तास तीन सप्टेशन अंतर्गत येणार्‍या सात गावातील वीजपुरवठा खंडित झाला होता व दुपारी बारा वाजेपासून पुन्हा हा वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला आहे.

तांत्रिक अडचणीने मनस्ताप
यावल शहरात सातोद रस्त्यावर 132 केव्हीए सबस्टेशन आहे. येथून ग्रामीण भागात विविध 33/11 सबस्टेशनला वीजपुरवठा करण्यात येतो. यात तालुक्यातील डोंगरकठोरा, सांगवी बुद्रुक आणि भालोद येथील सब स्टेशनला वीजपुरवठा देणार्‍या ब्रेकरमध्ये बुधवारी तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याने मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता होती. तातडीने या तीन्ही सबस्टेशनमधील विद्युत पुरवठा हा खंडित करण्यात आला आणि ब्रेकरची दुरुस्ती करण्यात आली. तब्बल दीड तासानंतर दुरुस्तीचे काम पूर्ण झाले. दीड तास या तिन्ही सबस्टेशन अंतर्गत येणार्‍या गावातील विद्युत पुरवठा खंडित होता. सकाळी साडे दहापासून खंडीत वीजपुरवठा दुपारी बारा वाजता सुरळीत करण्यात आला होता.


या गावातील वीजपुरवठा खंडित
ब्रेकरमध्ये तांत्रिक बिघाड निर्माण झाल्यामुळे डोंगरकठोरा, सांगवी बुद्रुक आणि भालोद या तीन्ही गावासह डोंगरदे, बोरखेडा, अट्रावल व चितोडा या सात गावातील वीजपुरवठा हा दीड तास खंडित राहिला होता. शेत शिवारातील वीजदेखील बंद होती.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !