डॉ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय साहित्य भूषण पुरस्काराने चाळीसगावचे चित्रकार कवी दिनेश चव्हाण यांचा सन्मान


Chalisgaon painter and poet Dinesh Chavan honored with Dr. Babasaheb Ambedkar National Sahitya Bhushan Award चाळीसगाव (14 एप्रिल 2025) : छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीबा फुले व कोट्यवधी दीनदुबळ्यांच्या ह्रदयाचे स्पंदन विश्वरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त विश्वशांती बुध्दिस्ट फाऊंडेशन व डॉ.बाबासाहेब बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय शिक्षक अकादमी आयोजित राज्यस्तरीय प्रबोधन कविसंमेलनात डॉ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय साहित्य भुषण पुरस्काराने चाळीसगाव येथील चित्रकार कवी दिनेश चव्हाण यांना सन्मानीत करण्यात आले.

रविवार, 13 एप्रिल 2025 रोजी राज्य सरकारी कर्मचारी कल्याण भवन शिवतीर्थाजवळ, धुळे येथे हा कार्यक्रम झाला. महाराष्ट्रभरातून एकूण 14 व्यक्तींनाच हा पुरस्कार देण्यात आला.

पहाडी आवाजाचे गायक, शिक्षक, आदर्श शेतकरी भास्कर अमृतसागर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

चित्रकार दिनेश चव्हाण यांचे सामाजिक, साहित्य, कला, शिक्षण या क्षेत्रातील असलेल्या कार्याबद्दल त्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. नुकतेच दिनेश चव्हाण यांचे पुस्तकाचे प्रकाशन मुंबईत हॉटेल ताज मध्ये संपन्न झाले होते, त्यांचे ओएमजी बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये जागतिक फास्टेस्ट स्केच आर्टिस्ट म्हणून देखील नोंद आहे. त्यांच्या विविध कलाकृती सर्वत्र झळकत असतात, शिवाय ते कवी असल्याने अखिल भारतीय संमेलनात देखील त्यांना मान्यवर निमंत्रित म्हणून स्थान मिळालेले आहे. अनेक कथा, काव्य लेख स्पर्धेत त्यांना पारितोषिके प्राप्त आहेत. अखिल भारतीय संमेलन ते आदिवासी साहित्य संमेलन, अखिल भारतीय अहिराणी साहित्य संमेलनाचे त्यांनी आपल्या कलाकुसरने लोगो बनवले होते, विविध साहित्यकृतीना त्यांनी मुखपृष्ठ देखील दिले आहेत, त्यांना यासाठी अनेकविध राष्ट्रस्तरीय, राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय पुरस्कार देखील प्राप्त आहेत. त्यांना या मिळालेल्या सन्मानाबद्दल कला, साहित्य, शिक्षण आदी क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे,





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !